जोधा अकबरला उत्तम प्रतिसाद
Saturday, February 16, 2008 08:13 [IST]

मुंबई- आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर या चित्रपटाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राजस्थान वगळता देशभरात काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये उत्साहात स्वागत झाले. चित्रपटाच्या मॅटिनी खेळालाही रसिकांनी गर्दी केल्याचे गेएटी गॅलेक्झी चित्रपटगृहाच्या प्रवक्त्याने सांगितले.

ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोला चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती. जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर, अभिषेक बच्चन आदींनी चित्रपटाच्या प्रिमियर शोला हजेरी लावली.

चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास झाल्याचा आरोप राजपूत समाजातील काही गटांनी केला आहे. जोधाबाई ही अकबराची पत्नी नसून सून होती असा काही इतिहासकारांचा दावा आहे. मात्र जोधाबाईच्या वंशजांचा या कथेला आक्षेप नसल्याचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी स्पष्ट केले. कोणाच्याही भावना दुखावू नयेत याची काळजी घेऊन चित्रपट तयार केल्याचे त्यांनी युएनआयला सांगितले.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम