मुंबई- अभिनेता संजय दत्त आणि मान्यता यांचा विवाहगोवा सरकारने अवैध ठरविल्याचे वृत्त टीव्ही वाहिन्यांनी प्रसारित केले आहे. उपनिबंधकांच्या कार्यालयाने लग्नाच्या नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप घेणारी तक्रार दाखल केल्यानंतर संजय दत्त-मान्यता यांच्या विवाह नोंदणीसंदर्भातील सर्व कागदपत्रे विधी खात्याकडे पाठविण्यात आली आहेत आणि याबाबतचा निर्णय होईपर्यंत हे लग्न अवैध ठरविण्यात आले आहे, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
दरम्यान, मान्यताच्या अगोदरच्या नव-यानेही संजय दत्त व मान्यता यांच्या विवाहाविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्याचा आणि मान्यताचा घटस्फोट अद्याप झालेला नसून त्याअगोदर दुस-या व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणे म्हणजे मुस्लिम विवाह कायद्याचे उल्लंघन आहे असा आरोप त्याने केला आहे.