मुंबई विद्यापीठाच्या सोहळ्यासाठी राष्ट्रपती 29 तारखेला मुंबई दौ-यावर
Friday, February 22, 2008 17:52 [IST]
मुंबई : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती प्रतिभा पाटील येत्या 29 फेब्रुवारी रोजी एका दिवसाच्या महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. प्रतिभा पाटील स्वत: विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असून त्या कालीना येथील विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे व एफएम रेडीओ कम्युनिटी प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत,असे सूत्रांनी सांगितले.
यावेळी देशाच्या प्रथम नागरिक असणा-या राष्ट्रपतींच्या सत्कारासाठी विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी राजाभाई टॉवरचा प्रतिकृती त्यांना भेट म्हणून दिली जाईल.