मुंबई : मुंबई पोलीसांनी आज शहरातील एक कोटी 29 लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करत चार दरोडेखोरांना वांद्रे - कुर्ला संकुलातून अटक केली. पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.
मुंबई पोलीसांच्या परिमंडळ सातला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यावेळी पीटर लॉरेन्स परेरा, सुभाष उर्फ बाबू शिवाजी गुरव, अब्दुल कादीर शेख उर्फ डब्बू आणि रमेश रामनाथ विश्वकर्मा यांना अटक केली. या प्रकरणातील अन्य एका आरोपीला अद्याप अटक व्हायची आहे.
14 एप्रिल 2006 रोजी चेंबूर येथे युटीआय बँकेवर हा दरोडा पडला होता.