सानिया मियामी मास्टर्समध्ये खेळण्यास असमर्थ
Thursday, March 27, 2008 14:35 [IST]

न्युयॉर्क- उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला मियामी येथे होणा-या सोनी एरिक्सन खुल्या टेनिस स्पर्धेतून अंग काढून घ्यावे लागले आहे. या स्पर्धेसाठी 2.1 दशलक्ष डॉलर्सचे पारितोषिक आहे.

मनगटाच्या दुखण्याने डोके वर काढल्यामुळे सानियाला गेल्या आठवड्यात पॅसिफिक लाइफ खुल्या स्पर्धेतील चौथ्या फेरीतही पराभव पत्करावा लागला होता. सोनी एरिक्सन स्पर्धेसाठी सानियाला 29वे मानांकन प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे पहिल्या फेरीत बाय मिळाल्यामुळे तिचा मुकाबला थेट दुस-या फेरीत जर्मनीच्या सबाईन लिसिकी हिच्याशी होणार होता.

मात्र मनगटाची दुखापत बरी न झाल्यामुळे सानियाला स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. सानिया स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे युक्रेनच्या मारिया कोरीत्सेवाला सोनी एरिक्सन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
पाकिस्तान मुस्लीम लीगच्या...
शिवाजी पार्कवर लालूप्रसाद...
चीनमधील भूकंपात सात...
चीनमधील भूकंपात 107 ठार, 900 जण...
भाविसेच्या पाच...
चलनवाढ आटोक्यात येण्याचा...
बॉम्बस्फोट मालिकेतील...
मुंबई शेअर बाजारात 124...
क्रिकेट सामन्यांवर बेटिंग...
उस्मानाबादजवळ रस्ता...
यंदा मान्सूनचे लवकर आगमन
रणबीरसोबत कोणतेही वाद नाहीत...