मुंबई - चित्रपट अभिनेता आमिर खानने चीनमध्ये होणा-या ऑलिंपिक स्पर्धेच्या मशाल फेरीत सहभागी होऊ नये, अशी विनंती विविध तिबेटी संघटनांनी केली आहे. नवी दिल्लीत 17 एप्रिल रोजी होणा-या या सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत, त्या सर्वांनाच तिबेटी संघटनांनी या प्रकारची विनंती केली आहे.
तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या अनेक गटांपैकी एक असणा-या लोभसांग गटाने ही माहिती दिली. सोहा अली खान, किरण बेदी यासारख्या मान्यवरांनी तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्याप्रती सहानुभूती दाखवून यात भाग घेऊ नये, असे आवाहन केल्याचे सांगण्यात आले.