मुंबई - टाटा मोटर्ससह अनेक बड्या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 71 अंकांची घसरण होऊन तो 16015.56 अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या कामकाजादरम्यान निर्देशांकाने 16,111.44 अंकांपर्यंत उसळी घेतली होती.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीत आज 1.40 अंकाची वाढ होऊन तो 4,830.25 अंकांवर बंद झाला.
बँक, माहिती तंत्रज्ञान, खनिज तेल आणि वायू या सारख्या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री झाल्याने निर्देशांकात घट झाल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.