शरद पवार लोकसभा निवडणुका लढवणार नाहीत
Thursday, March 27, 2008 18:23 [IST]

shaबारामती - प्रत्येकवेळी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणारे आणि आतापर्यंत प्रत्येक वेळी या पदाने हुलकावणी दिलेल्या तरीही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्या नावाचा कायम दबदबा राखणा-या मर्द मराठा गडी शरद पवारांनी यापुढे लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करुन भल्याभल्यांची दांडी गुल केली आहे. आतापर्यंत सहा वेळा ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले असून प्रत्येक वेळी त्यांच्या यशाची कमान वाढत्या मताधिक्क्याने चढतीच राहिली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला असला तरी संसदीय राजकारणात सक्रिय राहणार असल्याचे सांगत त्यांनी राज्यसभेतून निवडून जाण्याचा राजमार्ग आपल्यासाठी खुलाच ठेवला आहे. येथे एका कार्यक्रमात बातमीदारांशी बोलताना पवारांनी ही घोषणा केली.

सध्या देशाचे कृषीमंत्रीपद भूषवत असलेल्या पवारांकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदही आहे. मात्र त्यामुळे त्यांना अनेकदा टीकाकारांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. आपल्यानंतर बारामतीचा उत्तराधिकारी कोण असेल, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. सध्या राज्यसभेतून निवडून गेलेल्या त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठीच पवारांनी ही निर्णय घेतला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पवार 1967 सालापासून सक्रीय राजकारणात आहेत. बारामतीतून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत आपल्या संसदीय राजकारणाच्या कारकिर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत कधीच मागे वळून पाहिले नाही.


Source : Agencies

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...