बच्चन परिवाराच्या शो मधून लारा दत्ताची माघार
Thursday, March 27, 2008 20:26 [IST]

सुभाष के. झा

lara1मुंबई - अमिताभ बच्चनच्या 'अनफरगेटेबल शो' या स्टेज शोच्या जागतिक दौ-यातून लारा दत्ताने माघार घेतली आहे. जगातील काही निवडक ठिकाणी होणा-या स्टेज शोसाठी अक्षय कुमारने मात्र होकार दिला आहे. लाराने आपल्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीचे कारण सांगत या शोमधून माघार घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका या शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सात ते आठ कलाकारांची निवड सुरू आहे. अक्षय कुमारला त्याच्या शेड्यूलमुळे संपूर्ण दौ-यात सहभागी होता येणार नसल्याने काही निवडक ठिकाणीच तो सहभागी होईल.

विझक्राफ्टने आयोजित केलेला हा शो जुलै - ऑगस्ट महिन्यात होणार आहे. संगीतकार जोडी विशाल शेखर या दौ-यात बच्चन परिवाराची सोबत करेल. याआधी कल्याणजी - आनंदजी अशा प्रकारचे कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करीत असत.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...
ठाणे - पोटनिवडणुकीकडे...
उच्च माध्यमिक शाळांसाठी
इस्लामिक पक्षाच्या 500...
मुंबई शेअर बाजारात 343.58...
रेसलिंगमधील मारामा-यांचा...
पुन्हा युध्द नकोः पाक
अकोला येथे दूषित पाण्याने...
भाषा बोलणा-यांचा मेंदू...