गांधी आडनाव लाभले - राहुल गांधींची कबुली
Thursday, March 27, 2008 21:52 [IST]

मंगलोर - गांधी हे आडनाव आपल्या नावापुढे होतं, म्हणूनच आपण राजकारणात यशस्वी झालो, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज केले. मणिपाल महाविद्यालयात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते.

सत्तेचा दुरूपयोग राजकारण्यांकडून होत असल्याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.

माझ्या नावापुढे गांधी हे आडनाव जोडलं गेल्यानं तर माझा राजकीय प्रवास सुकर झाला, असेही त्यांनी सांगितले.महात्मा गांधींचे अनेक गुण समजून, ते अंगिकारण्याचा प्रयत्न मी करतो, किंबहुना कुठल्याही माणसामधले गुण स्वीकारणं मला आवडतं, असंही त्यांनी नमूद केलं.

समाजात बदल घडवण्यासाठी तरुणांनी विशेषत: सुशिक्षितांनी पुढे यायला हवे असं आवाहनही त्यांनी या विद्यार्थ्यांना केलं.


Source : T-Indiainfo

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
अद्याप संपर्काबाहेर
रेडिओचा मराठी आवाज
कर्नाटकात प्रचार मोहीम
सहा टक्क्यांवर येईल-...
कोलकाता संघाला दंड
मुद्दयावर तोडगा नाही
सेन्सेक्स
यादीत रतन टाटा
युरोपीय संघाची बैठक
शर्यत संपली- प्रसारमाध्यमे
युएइच्या दौ-यावर
सचिन खेळण्याची शक्यता