`पंतप्रधानपदासाठी मनमोहन सिंगच सर्वोत्तम'
Friday, March 28, 2008 08:30 [IST]

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. आघाडी सरकार चालवताना मनमोहन सिंग यांची भूमिका अत्यंत लोकशाहीवादी राहिली आहे. शिवाय ते अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक आहेत आणि त्यांच्याबाबत कोणताही वाद नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी सांगितले.

आघाडी सरकारला मनमोहन सिंग यांच्यासारखेच पंतप्रधान आवश्यक आहेत, असे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुका लढवताना पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा याविषयी सूचना करणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या डझनभर घटक पक्षांपैकी पहिलाच पक्ष आहे.

कॉंग्रेस मात्र पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयी बोलणे टाळत आहे. याविषयीचा निर्णय निवडणुका जवळ आल्यानंतर घेता येईल. या मुद्दयावर आत्ताच चर्चा सुरू करण्याची गरज नाही, असे कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे.

तरुण नेते राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेस भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहे याविषयी राष्ट्रवादीची प्रतिक्रिया विचारली असता त्रिपाठी म्हणाले की राहुलबाबत कॉंग्रेसला प्रथम निर्णय जाहीर करू दे. कॉंग्रेसने तसा निर्णय जाहीर केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या त्याला शुभेच्छाच मिळतील.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...