नायकापेक्षा मोठ्या वयाच्या नायिकांची लाट
Friday, March 28, 2008 09:03 [IST]

मुंबई- आपल्यापेक्षा वयाने लहान असणा-या अभिनेत्यांसोबत काम करण्याची सध्या बॉलिवुडमध्ये लाटच आलेली दिसते आहे. या लाटेत नुकतीच सामील झालेली अभिनेत्री आहे बिपाशा बसू. तिचे पुढचे दोन चित्रपट रणबीर कपूर आणि नील नितीन मुकेश या नव्या दमाच्या अभिनेत्यांसोबत आहेत. सिद्धार्थ आनंदच्या `बचना ए हसिनों'मध्ये बिपाशाचा नायक रणबीर कपूर आहे तर जहांगीर सुरती या नवोदित दिग्दर्शकाच्या `फ्रीज' या चित्रपटात तिच्यासोबत नील नितीन मुकेश आहे.

`फ्रीज'मध्ये बिपाशा बसू डीजेची भूमिका करते आहे तर तिचा नायक नील नितीन मुकेश आहे एका फोटोग्राफरच्या भुमिकेत. अर्थात आत्ता या भुमिकेविषयी फार काही बोलायची तिची तयारी नाही. "सध्या आम्ही याबाबत चर्चा करत आहोत. मला कथा आवडली आहे. मात्र आत्ता याविषयी बोलणं फारच लवकर होईल," बिपाशा म्हणाली. प्रत्यक्षात तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेला नील मात्र याविषयी स्पष्टपणे बोलला. "`फ्रीज' चित्रपटात बिपाशा माझी नायिका आहे. तिच्यासोबत काम करण्याची मला खूपच उत्सुकता आहे कारण ती माझी आवडती अभिनेत्री आहे," तो म्हणाला.

प्रत्यक्षात त्या दोघांच्या वयात असलेला फरक लक्षात आणून दिल्यानंतर नील जरा अवघडल्यासारखा झाला. "वयातला फरक पडद्यावर अजिबात जाणवणार नाही. ती माझ्याअगोदर या क्षेत्रात आली आहे याचा चित्रपटाच्या कथेशी काहीच संबंध नाही. शिवाय या चित्रपटात आमच्या व्यक्तीरेखा तशाच आहेत. तिची व्यक्तीरेखा वयाने मोठी आहे आणि मी नव्याने व्यवसाय सुरू केलेल्या फोटोग्राफरची भूमिका करतो आहे," त्याने सांगितले. `बचना ए हसिनों'मध्ये रणबीरची व्यक्तीरेखा तिच्या व्यक्तिरेखेपेक्षा वयाने लहान आहे हा योगायोग असल्याचे तो म्हणाला.

चित्रपटातील व्यक्तीरेखेमध्ये काही चढउतार असावेत असा नीलचा आग्रह असतो. "`जॉनी गद्दार'मधील माझ्या व्यक्तीरेखेचा निश्चित असा आलेख होता. ही व्यक्तीरेखा हाव ते तडजोड असा प्रवास करणारी होती. सुधीर मिश्रांच्या `तेरा क्या होगा जॉनी' या चित्रपटातल्या माझ्या व्यक्तीरेखेलाही बरेच कंगोरे आहेत," त्याने सांगितले.

पुन्हा एकदा नायकापेक्षा मोठ्या वयाची नायिका साकारण्यास बिपाशा तयार नव्हती पण बॉयफ्रेंड जॉन अब्राहमने तिचं मन वळवलं हे नीलनेही मान्य केलं. "ते खरं आहे. बिपाशाने कथानक वाचलं तेव्हा तिच्या मनात काही शंका होत्या. दिग्दर्शक जहांगीर सुरती जॉनचा मित्र असल्याने जॉननेही कथानक वाचलं आणि बिपाशाला ते स्वीकारण्याचा आग्रह केला," त्याने सांगितलं.

नायकापेक्षा मोठ्या वयाची नायिका सर्रास सगळ्या चित्रपटात दिसत नसली तरी असे अनेक प्रयोग पूर्वीही झालेले आहेतच. काही वर्षांपूर्वी डिंपल कपाडियाने `दिल चाहता है'मध्ये अक्षय खन्नासोबत, `बीइंग सायरस'मध्ये सैफ अली खानसोबत आणि `लीला'मध्ये अमोल म्हात्रेसोबत काम केलं होतं. त्याआधी दीपा साहीने शाहरुख खानसोबत `माया मेमसाब'मध्ये वयाने मोठी नायिका साकारली होती आणि त्याहीअगोदर नूतनने `सौदागर'मध्ये अमिताभ बच्चनची नायिका रंगवली होती.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...