मनसेच्या पोस्टर मोहिमेवर अमिताभचे मौन
Friday, March 28, 2008 13:59 [IST]

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या वादात पडण्याची इच्छा नसल्याचे संकेत अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात विकत घेतलेली जमीन मूळ शेतक-यांना परत करण्याच्या उद्देशाने केलेले दानपत्र मागे घेण्याच्या अमिताभ बच्चन यांच्या निर्णयाची टर उडविणारी पोस्टर्स मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जागोजागी लावली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे बच्चन म्हणाले.

"भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला भाषणाचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. मी राज्यघटनेचा आदर करतो आणि तिचे पालनही करतो. यापलीकडे मला काहीच बोलायची इच्छा नाही," असे बच्चन यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीच्या एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. बच्चन अकादमीचे ब्रॅण्ड अंबॅसडर आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वक्तव्यांचा तसेच कृतींचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नसल्याचेही बच्चन यांनी या वेळी स्पष्ट केले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
पाकिस्तान मुस्लीम लीगच्या...
शिवाजी पार्कवर लालूप्रसाद...
चीनमधील भूकंपात सात...
चीनमधील भूकंपात 107 ठार, 900 जण...
भाविसेच्या पाच...
चलनवाढ आटोक्यात येण्याचा...
बॉम्बस्फोट मालिकेतील...
मुंबई शेअर बाजारात 124...
क्रिकेट सामन्यांवर बेटिंग...
उस्मानाबादजवळ रस्ता...
यंदा मान्सूनचे लवकर आगमन
रणबीरसोबत कोणतेही वाद नाहीत...