भारताचा जी-आठमध्ये समावेश व्हावा- मॅकेन
Friday, March 28, 2008 14:32 [IST]

वॉशिग्टन- अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठीचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सिनेटर जॉन मॅकेन यांनी जी-आठ समुहात भारताचा समावेश करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. जगातील आठ अग्रगण्य अर्थव्यवस्थांच्या या समुहातून रशियाला वगळावे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जगातील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेल्या लोकशाही राष्ट्रांच्या या समुहात भारतासह ब्राझिलचाही समावेश करावा, असे मॅकेन यांनी सुचविले आहे. लॉस एंजेलिस येथील जागतिक घडामोडींच्या परिषदेत ते परराष्ट्र धोरणावर भाषण करत होते.

जी-आठमध्ये भारताच्या समावेशासाठी समुहातील ब्रिटन आणि फ्रान्स या सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जी-आठमध्ये या देशांशिवाय कॅनडा, जर्मनी, इटली. जपान, रशिया आणि अमेरिकेचा समावेश आहे. जी-आठच्या मागील काही बैठकींना आमंत्रित करण्यात आलेल्या पाच देशांच्या गटात भारताचा समावेश असून हा गट जी-आठचा विस्तारित भाग समजला जातो. या विस्तारित गटात भारतासह ब्राझिल, चीन, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश होतो.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरे
खैरलांजी खटल्यातील
मनेका गांधी
राज ठकारेंवर
अणुकरारासंबंधी
विदर्भात नव्या विकासयुगाची
जीना यांच्यावर पुस्तक
सरबजितची शिक्षा
नानावटींच्या
कर्नाटक निवडणूकाः
जुंता विरोधी निदर्शने
अहवाल सादर करणार