चलनफुगवट्याच्या दराचा वर्षभरातील उच्चांक
Friday, March 28, 2008 15:20 [IST]

नवी दिल्ली- चलनफुगवट्याच्या दराने गेल्या वर्षभरातील उच्चांक पार केला असून 15 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात चलनफुगवटा तब्बल 6.68 टक्के इतका नोंदविला गेला आहे. अन्नपदार्थ आणि धातुंचे दर वधारल्यामुळे चलनफुगवट्यात ही विक्रमी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यात चार टक्क्याच्या आसपास असलेल्या चलनफुगवट्याच्या दरात सातत्याने वाढच होत आहे. याअगोदरच्या आठवड्यात चलनफुगवट्याचा दर 5.92 टक्के इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून धातुंच्या किमती सतत वाढत आहेत. भाज्या, तेलासारखे खाद्यपदार्थही महाग झाले आहेत.

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जाहीर झाल्याचा परिणामही चलनफुगवट्यावर झाला असण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 2008-09 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सामाजिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्यामुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्यानेही चलनफुगवचा वाढल्याचे विश्लेषकांनी नमूद केले.

चलनफुगवट्यातील विक्रमी वाढीमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेला व्याजदरांच्या बाबतीतील ताठर भूमिका कायम ठेवावी लागणार अशी चिन्हे आहेत. महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनेही त्वरित उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...