मुंबई - राज्य सरकारच्या शाळांतील सर्व शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या दिवशी त्यांचे वेतन मिळेल, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिले. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. सर्व शिक्षकांना इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग पद्धतीने वेतन मिळेल, अशी यंत्रणा राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नसल्याचा मुद्दा लोकभारतीचे कपिल पाटील यांनी उपस्थित केला होता.