मुंबई शेअर बाजारात 356 अंकांची वाढ
Friday, March 28, 2008 18:19 [IST]

मुंबई - चलनफुगवट्याच्या दराने गाठलेला सहा टक्क्यांचा आकडा आणि त्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या चिंतेची पर्वा न करता गुंतवणुकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात शुक्रवारी तब्बल 356 अंकांची वाढ होऊन तो 16,371 अंकांवर बंद झाला. आशियाई तसेच युरोपीय बाजारपेठेतील सकारात्मक वातावरणाचाही आजच्या तेजीला हातभार लागला.

बाजारात या आठवड्याच्या सुरूवातीला आलेल्या तेजीनंतर मात्र कालपर्यंत तसे निराशाजनकच वातावरण होते. त्यामुळे कालपर्यंतच्या दोन दिवसांची मंदी भरुन काढत निर्देशांकात 355.73 अंकांची वाढ होऊन तो 16,371.29 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत निर्देशांकात 202 अंकांची घसरण झाली होती. दिवसभराच्या कामकाजादरम्यान 16,452.08 अंकांपर्यंत वर गेला होता.

राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकातही आज 111.75 अंकांची वाढ होऊन तो 4,942.00 अंकांवर बंद झाला.


Source : Agencies

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...