मुंबई - पत्रकारांना विशेषच: इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना योग्य रितीने प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील प्रेस क्लबच्या नवीन इमारतीचे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. प्रेस क्लबने या प्रशिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना चिमटे काढत त्यांनी लोकांशी संवाद साधण्याची कला शिकून घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. तसेच समोरच्या माणसाला असंबद्ध प्रश्न विचारणे टाळावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.