मी स्वत:ला सिद्ध केले - सेहवाग
Friday, March 28, 2008 21:58 [IST]

चेन्नई - ऑस्ट्रेलियातील चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांमधून वगळल्यानंतर मला फारच वेदना झाल्या होत्या. त्यामुळे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी आपण आसुसलो होतो व त्यातूनच आजची खेळी साकारली असे विरेंदर सेहवागने तिस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बातमीदारांना सांगितले. आजच्या दिवसावर केवळ त्याचेच वर्चस्व राहिले. आज साकार केलेली 309 धावांची नाबाद खेळी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी असल्याचेही तो म्हणाला.

या सामन्यांमधून वगळण्यात येणे तसे माझ्यासाठी लाभदायक ठरले कारण त्यानंतरच मी अधिक निर्धाराने खेळ करु शकलो. वातावरणातील आर्द्रतेने शरीरातील पाणी संपत होते मात्र नारळपाणी व मीठ घेऊन मी जलशुष्कता टाळण्याचा प्रयत्न करीत होतो, असे त्याने सांगितले. त्यासाठी संघाचे फिजीयो आणि पियुष चावला व इरफान पठाण या सहका-यांनी मोलाचे योगदान दिले, असेही तो म्हणाला.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...