नवी दिल्ली : नर्मदा बचाव आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी,या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना नोटिस बजावली आहे.
आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडविला होता आणि ते सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहचवित होते,त्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करण्यावाचून पर्याय नव्हता,असे मुख्य न्यायमूर्ती के.जी.बालकृष्णन व आर.व्ही.रविंद्रन यांनी सांगितले होते.या विरोधात आंदोलनकर्त्यांनी याचिका दाखल केली होती.