`पाकिस्तानने अफगाण सीमेवर नियंत्रण ठेवावे'
Saturday, March 29, 2008 08:16 [IST]

सिडनी- पाकिस्तानची अफगाण सीमा ओलांडून येणा-या दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या नवनिर्वाचित सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाच्या हवाई दल प्रमुखांनी आज व्यक्त केले.

तालीबानी बंडखोर अफगाणिस्तानातील नागरिकांवर तसेच पाश्चात्त्य देशांच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातील तळांचा वापर करत आहेत, असे ऑस्ट्रेलियाच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अँगस हुस्टन यांनी सांगितले आहे.

अफगाण सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याकरता सर्व पाश्चात्त्य राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे हुस्टन म्हणाले. दहशतवाद्यांना सीमा ओलांडून दोन्ही देशांमध्ये मुक्त संचार करू देता कामा नये, असे त्यांनी फेअरफॅक्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पुढीस आठवड्यात रोमानियामध्ये होणा-या नाटोच्या बैठकीत हुस्टन सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया हे नाटोचे सदस्य राष्ट्र नसले तरी नाटो प्रणित आंतरराष्ट्रीय सुरक्षा उपक्रमासाठी ऑस्ट्रेलियाने दक्षिण-मध्य अफगाणिस्तानात 1000 सैनिक तैनात केले आहेत.

पाकिस्ताननेही दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाण सीमेवर सुमारे 90 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
भारताने पाकचा घुसखोरीचा...
मुंबई दंगलप्रकरणी 20 जणांची...
सहाव्या वेतन आयोगासाठी...
राज ठाकरेंचे तीन मे चे भाषण...
देशातील हस्तकारागिरांसाठी...
विदर्भात उष्णतेची लाट कायम
भारत पाकिस्तानकडे...
आयआयटीची 50 वर्षात जग...
भज्जी - श्रीसंत प्रकरणाची...
शेअर बाजापाप्रमाणेः...
विद्यार्थ्यांची गळती...
यशराज फिल्मस् वादाच्या...