पणजी - स्कार्लेटच्या खुन्यांना आपण ओळखत असल्याचा दावा तिची आई फियोनाला आता चांगलाच महाग पडला असून गोवा पोलीसांनी तिला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. ब्रिटीश पर्यटक तरुणी स्कार्लेट फेब्रुवारी महिन्यात गोव्यातील अंजुना किना-यावर संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडली होती.
फियोनाने प्रसारमाध्यमांजवळ बोलताना स्कार्लेटची हत्या झाली असून तिच्या खुन्यांना ओळखत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे फियोनाने जर ती खुन्यांना ओळखत असेल तर त्याची माहिती पोलीसांना द्यायला हवी, असे मत व्यक्त करीत पोलीसांनी तिला समन्स बजावले.