अकोला - अकोला येथे दूषित पाण्याने दोघांचा मृत्यू तर अन्य दोघे जण अत्यवस्थ झाल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. हे पाणी प्यायल्यानंतर चौघांचीही प्रकृती बिघडली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्यातील दोघे जण उपचार सुरू असताना मरण पावले.
हे चौघेही जण नजिकच्या बार्शीटाकळी तालुक्यातील कामगार आहेत. या कामगारांचा दूषित पाण्याने मृत्यू होण्याचे प्रकरण तात्काळ संबंधित खात्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे.