इस्लामाबाद - भारत-पाक दरम्यान सध्या मैत्रीचे संबंध असून काश्मिर प्रश्नावरून पाकिस्तानला भारताशी अजून एक युध्द करण्याची इच्छा नाही, असे पाकिस्तानी संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तियार यांनी सांगितले.
इतिहासात कधी नव्हते इतके चांगले संबंध सध्या या दोन्ही देशांमध्ये आहे. त्यांचा आपआपसांतील भरोसा वाढत आहे. तसेच पाक लष्करीदृष्टया सध्या पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे, असे मुख्तियार म्हणाले.
काश्मिर प्रश्न फक्त संवादाद्वारे सुटू शकेल.या प्रश्नाव्यतिरिक्तही अन्न कमतरता, गरीबी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न या दोन्ही देशांसमोर आहे. तसेच सध्या आर्थिक युध्दाचा काळ आहे.
भारताला आर्थिक बाबींमध्ये मदत करण्यास पाकिस्तान तयार असून इराण कडून आम्हीही तेल विकत घेऊ आणि ही पाईपलाईन आमच्या देशांतून भारतात गेली तर आम्हाला आनंदच आहे, असे त्यांनी सांगितले.