रेसलिंगमधील मारामा-यांचा मुलांवर परिणाम होत नाही - खली
Friday, May 09, 2008 16:11 [IST]

khali1मुंबई - रेसलिंगच्या सामन्यांतील हाणामा-यांचा लहान मुलांवर विपरित परिणाम होत असल्याचे मत प्रख्यात रेसलिंगस्टार आणि लहान मुलांचा आवडता कुस्तीवीर खली उर्फ दलिप सिंग राणा याने खोडून काढले आहे. हा खेळ इतर खेळांसारखाच एक खेळ आहे, मात्र मुलांनी या खेळातील हाणामा-या घरी करु नयेत, असा सल्ला द्यायला मात्र तो विसरला नाही.

दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या खलीने आज मुंबईत झोपडपट्टीतील तसेच समाजातील दुर्लक्षित वर्गांसाठी राबवल्या जात असलेल्या शाळांतील मुलांची भेट घेतली. त्यावेळी त्याने या मुलांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

तुझ्याप्रमाणे आम्हालाही हा खेळ खेळता येऊ शकेल का, असा प्रश्न काही मुलांनी त्याला विचारला होता, त्यावर उत्तर देताना हा खेळ खूपच महागडा आहे, मात्र वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट डब्लू.डब्लू.ई.ला या खेळात भारतीय मुलांना सहभागी होण्याच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची विनंती करु असे सांगितले.

या खेळात भारताची मान अमेरिकेत राहून उंच करता आली असे त्याने अभिमानाने सांगितले. यावेळी त्याने मुलांना जोमाने अभ्यास करण्याचाही सल्ला दिला. भारतात क्रिकेटला लोकप्रियता असूनही रेसलिंगचे सामने अतिशय आवडीने पाहिले जातात, याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.

सचिन तेंडुलकर एक खूप चांगला माणूस असल्याची प्रतिक्रियाने खलीने यावेळी दिली.

हिमाचल प्रदेशात जन्म झालेल्या खलीने 1999 साली अमेरिकेत या खेळाचे प्रशिक्षण घेतले त्यानंतर 2006 सालापासून या स्पर्धेत त्याने बड्या बड्या स्पर्धकांना धूळ चारल्यापासून तो चर्चेत आहे.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरे
खैरलांजी खटल्यातील
मनेका गांधी
राज ठकारेंवर
अणुकरारासंबंधी
विदर्भात नव्या विकासयुगाची
जीना यांच्यावर पुस्तक
सरबजितची शिक्षा
नानावटींच्या
कर्नाटक निवडणूकाः
जुंता विरोधी निदर्शने
अहवाल सादर करणार