इस्लामिक पक्षाच्या 500 कार्यकर्त्यांना तामिळनाडूत अटक
Friday, May 09, 2008 17:11 [IST]
तामिळनाडू - येथील 200 वर्षे जुन्या मशिदीत परवानगीशिवाय नमाज पढण्यासाठी गेलेल्या तामिळनाडू मुस्लिम मुनेत्र कझगम पक्षाच्या पाचशे कार्यकर्त्यांना ाज पोलिसांनी अटक केली.
भारतीय पुरात्तव खात्याने एका किल्ल्याच्या आत असलेल्या या मशिदीत प्रवेश करण्यास परवानगी नाकारली असतानाही हे कार्यकर्ते तेथे घुसले. त्यांनी शांततेत नमाज पढला आणि विरोध न करता अटकेला सामोरे गेले. या वरून भविष्यात काही तरी भयानक कड शिजत असल्याचे सूचित ढाले आणि ही फक्त त्या घटनेची रंगीततालीम असल्याचे वेल्लोरचे जिल्हाधिकारी डी.पी.यादव यांनी सांगितले.
या मशिदीत नमाज पढणे मुस्लिमांचा जन्मसिध्द हक्क आहे, असे सांगून पक्ष कार्यकर्ते गेल्या आठवडाभरापासून राज्यात इतर मुस्लिमांना आव्हान करीत होते.