नवी दिल्ली - शाळेतील आठवी इयत्तेनंतर होणारे गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्राने उच्च माध्यमिक गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना आखलीआहे, या साठी 30.4 बिलियन रूपये देण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी आज केली.
आर्थिक बाबी बघणा-या कॅबिनेट समितीने शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे सांगून अकराव्या पंचवार्षिक योजनेत हा निधी वापरण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीडलाख रूपयांच्या वरती नसेल त्यांच्या पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होईल. मात्र या शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्यासाठी विद्यार्थ्याला राज्या सरकारची आठवीची परिक्षा देणे गरजेचे आहे.