भज्जी - श्रीसंत प्रकरणाची सुनावणी पूर्ण
Friday, May 09, 2008 18:23 [IST]

अहमदाबाद - हरभजन सिंगकडून जलदगती गोलंदाज श्रीसंतच्या श्रीमुखात लगावण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या सुधीर नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. याप्रकरणी ही समिती आता सोमवारी आपला अहवाल देणार आहे.

नानावटी यांना या प्रकरणी माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. ते आपला अहवाल बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी सादर करतील.

आज हरभजन व श्रीसंत हे दोघेही आपली बाजू मांडत असताना बीसीसीआयचे सचिव निरंजन शहा, बोर्डाचे वकील अकिला उपस्थित होते. चार व्हीडीओ कॅमे-यांच्या मदतीने ही सुनावणी रेकॉर्ड करण्यात आली आहे.

याबाबत निरंजन शहा हे सायंकाळी माध्यमांशी बोलतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नानावटी यांनी हरभजनने श्रीसंतवर केलेल्या हल्ल्याचे चित्रण पाहून धक्का बसल्याची प्रतिक्रीया दिली होती.


Source : T-Indiainfo

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरेंची
डेअर डेव्हिल्स 156
महिलेवर सामूहिक बलात्कार
आसामः ब्लॅक विडो
ताडोबात वाघाचा मृत्यु,
युरेनियम शोधमोहिमेसाठी
जम्मूः दहशतवाद्यांच्या...
घाबरत नाहीः खली
नाईट रायडर्सचा
गृहमंत्री पाटील
निकृष्ट गव्हाचा साठा सरकार...
पुण्यात लवकरच अत्याधुनिक...