मुंबई - येत्या 50 वर्षात जग बदलण्याची इच्छा बाळगत आयआयटी मुंबईने जागतिक पातळीवर पुढाकार घेत यासाठी 10 महान संकल्पना सादर करण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आदी गोदरेज यांनी या संकल्पनेचे प्रकाशन केले. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक अशोक मिश्रा उपस्थित होते. या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजिक कार्यक्रमांचा भाग म्हणून ही संकल्पना राबवली जात आहे.
या दहा महान संकल्पना संस्थेचे माजी विद्यार्थी, विद्यमान विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारीवर्गासाठीच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित या संकल्पना ही मंडळी जगाच्या कोणत्याही कोप-यातून पाठवू शकतात, असे मिश्रा यांनी सांगितले. त्यासाठी http://10greatindieas.iitb.ac.in हे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर 2008 पर्यंत आपल्या कल्पना पाठवल्या जाऊ शकतात.