देशातील हस्तकारागिरांसाठी आरोग्यविमा योजना
Friday, May 09, 2008 21:05 [IST]

नवी दिल्ली - देशभरातील हस्तकारागिरांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसुविधा घेण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून एका आरोग्यविमा योजनेची सुरुवात केली. आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्सच्या सहकार्याने ही योजना राबवली जाणार आहे.

राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य बिमा योजना असे या योजनेचे नाव असून हस्तकारागिरांसाठीची ही देशातील पहिली योजना आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डने एका प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली.

ही योजना देशातील मोठ्या प्रमाणावरील हस्तकारागिरांना आरोग्यविम्याच्या कक्षेत आणेल व दुस-या टप्प्यात देशातील आठ लाख 82 हजार हस्तकारागिरांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल, असे वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंग वाघेला यांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत सर्वसमावेशक आरोग्य सेवा दिली जाणार असून त्यात रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचे आणि त्याआधीच्या औषधोपचारांसह देशातील एक हजार 700 रुग्णालयातील 505 बाह्य रुग्ण विभागात कोणत्याही खर्चाविना उपचार करता येतील.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम