मुंबई - सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंद्र सरकारने केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी दिली. राज्य सरकारच्या सेवेतील राजपत्रित अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते.
राज्य सरकारच्या कर्मचा-यांवर हल्ले करणा-यांना कडक शासन करण्यासाठी विद्यमान कायद्यात सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.