जम्मू/नवी दिल्ली - पाकिस्तानी रेंजर्सकडून सांबा क्षेत्रात केलेल्या गोळीबाराचा आणि 12 घुसखोरांकडून केल्या गेलेल्या घुसखोरीच्या प्रकाराचा भारताने निषेध केला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी मात्र शुक्रवारी झालेल्या ध्वज बैठकीत या प्रकाराचा इनकार केला आहे. पाकिस्तानी सैन्यातील कोणाचाही या दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न नव्हता असे रेंजर्सनी स्पष्ट केले. काश्मीरच्या सुचेतगड क्षेत्रात ही ध्वज बैठक झाल्याचे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सांगितले.
दोन्ही देशातील सध्याचे शांततेचे संबंध बिघडू नयेत अशी कोणतीही कृती पाकिस्तानी रेंजर्सकडून घडू देऊ नये, असा स्पष्ट इशाराही सीमा सुरक्षा दलाने दिला.
पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री गोळीबाराच्या तब्बल एक हजार फैरी झाडल्या गेल्या होत्या.