जपान, मलेशियात जुंता विरोधी निदर्शने
Saturday, May 10, 2008 15:31 [IST]

कुला लुम्पुर - म्यानमारमध्ये नर्गिस चक्रिवादळाने कहर माजविल्याच्या एका आठवडयानंतरच तेथील लष्करी सरकार जुंता आज कॉन्स्टीट्युटशन्ल रेफरन्डम सादर करणार असल्याच्या मुहुर्तावर जपान व मलेशिया मधील शेकडो लोकांनी या हुकमूशाही सरकारविरूध्द निदर्शने केली.

येथील म्यानमारच्या दूतालयाबाहेर साधारण पाचशेच्या जमावाने लाल टी-शर्ट वर 'नो' असे लिहून तो घालून आपला असंतोष व्यक्त केला. अनेक वर्षांपासून ते आमच्या लोकांवर बंदूक रोखून आहेत, चक्रिवादळाच्या निमित्ताने ते आता लोकांची सहानुभूती मिळवू शकत नाही, असे मत थान तुन ऑन या बंडखोराने व्यक्त केले. यानेच इतरांना या कृत्रिम लोकशाही विरोधात आवाज उठविण्यासाठी प्रेरित केले.

निदर्शनकर्त्यांनी 'जुंता गेट आउट' , 'सायक्लोन नर्गिस एन्ड जुंता आर किलर्स' , असे लिहिलेली पोस्टर्स तयार केले होते.

तसेच जपानच्या टोकियो शहरात ही शेकडोंनी निदर्शने केली. बर्मा शहराला 'थान शेव' या खुन्याची गरज नाही, अशा आशयाची बॅनर्स त्यांनी हातात पकडली होती.

चक्रिवादळ येण्याच्या आधीही लोकांनी तेथील हुकुमशाहीला विरोध दर्शविला होता. तेथील सरकारी वाहिनी सातत्याने लोकांना सांगत आहे की, नवीन संविधानाच्या निर्मितीला मदत करणे तुमचे कर्तव्य आहे, त्यामुळे मत द्या.


Source : UNI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम