इस्लामाबाद - सरबजित याला क्षमा मिळावी असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलाणी याचे वैयक्तिक मत असून त्याच्या खटल्याचा पुर्नविचार करण्यासाठी त्यांनी राष्ट्रपती परवेझ मुशरर्फ यांना सांगितले आहे.
गिलाणी पाकिस्तानच्या सभागृगाचे सभापती असताना त्यांनी बेकायदेशीररित्या काही व्यक्तींना नोकरी दिल्याच्या कारणावरून त्यांना काही वर्षे तुरूंगवास भोगावा लागला होता. या काळातील त्यांच्या अनुभवावरून त्यांनी सरबजित याला 1 मे रोजी देण्यात येणारी फाशी मुशरर्फ यांना विनंती करून पुढे ढकलली. आता सरबजितची फाशीची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
राष्ट्रपती, परराष्ट्रखाते, कायदा व न्याय व्यवस्था, मानवाधिकार आयोग या सर्वांनी एकत्र बसून डरबजितच्या खडल्यावर विचार करून निर्णय घ्यावा, असे गिलाणी यांनी मिशरर्फ यांना सूचविले आहे.