नवी दिल्ली - भारतीय जनाता पक्षाच्या एल.के.आडवाणी यांनी 2005 सालात मोहम्मद अली जीना सर्वधर्मसमभाव माननारे नेता होते, असे सांगून गोंधळ उडवून दिला होता, त्यानंतप आता त्यांच्याच पक्षाचे जसवत सिंग देखील जीनांच्या प्रेमात वाहत जाऊन त्याचमया आयुष्यावर आधारित पुस्कत लिहित आहेत.
'1947-ए फ्रक्चरड फ्रीडमः जरनी ऑफ मोहम्मद अली जीना फ्रॉम हिंदू-मुस्लिम युनिटी टू कैद-ए-आझम ऑफ पाकिस्तान', असे या पुस्तकाचे नाव असून ते सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. इंग्रजी बरोबरच हे पुस्तक हिंदूव उर्दू भाषेत एकाचवेळी प्रकाशित होणार आहे. या पुस्काचा प्रकाशनसमारंभ पाकिसल्तानात करण्याची जसवंत यांची इच्छा आहे.
या पुस्तकात इतिहासाचा मागोवा घेण्यात आला आहे. मुस्लिम भारतात कधी आले इथपासून ते भारताची फाळणी कशी झाली व त्यासाठी कोण जबाबदार आहे, अशी सर्व माहिती या पुस्ताकत असल्याचे जसवमत यांनी सांगितले.