अमरावती - 'विदर्भात नव्या विकासयुगाची सुरूवात झाली आहे', असे उद्गार मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे काही विकासप्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी आले असताना काढले.
देशमुख म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात 6 हजार करोड रूपये मंजूर झाले ्सून त्यातील 2,600 करोड फक्त विदर्भासाठी आहे. या 2,600 करोड मधील 2 हजार करोड अमरावती विभाग व उरलेले नागपूरच्या विकासासाठी आहे.
राजकीय नेत्यांनी आता राजकीय क्षेत्रात विकासाची गती वाढवावी, असे आव्हान त्यांनी केले.
विकासप्रकल्पांसाठी शेतक-यांकडून जमिन घेताना त्यांना त्याची योग्य भरपाई देण्यात येईल व त्यांचे व्यवस्थित पुर्नवसन करण्यात येईल, असे आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले.
तसेच पुढील दोन वर्षात सिंचनक्षेत्रातील सर्व कामे पुर्ण होतील. यावेळी देशमुख यांनी तेरा नवीन विकासप्रकल्पांची माहिती लोकांनी दिली.