नवी दिल्ली - भारत-अमेरिका अणुकरार संबंधी देश माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मताचा आदर करावा, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशवासियांना आव्हान केले आहे.
कलाम हे वेगळया घाटणीतले शास्त्रज्ञ आहे, असे सांगून सिंग म्हणाले की, पोखरण येथील अणुचाचणीशी कलाम जवळून निगडीत आहेत. माझी अपेक्षा आहे की, देश त्यांच्या मताचा आदर करतील.
राष्ट्रपती भवन येथे झालेल्या पद्म पुरस्कार प्रदान समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. डाव्यांना उद्देशून सिंग यांनी हे वक्तव्य केले का, या प्रश्नाचे त्यांनी नाही असे उत्तर दिले.