दुबई - भारतीय जनता पक्षाच्या(भाजपा) खासदार व पर्यावरणवादी कार्यकर्ता मेनका गांधी यांना पशु अधिकार, जंगलतोड, वातावरणीय बदल व नद्यांच्या प्रदूषणासंबंधी जागरूकता निर्माण केल्याहद्दल एएसजी जायकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ओमान मध्ये ‘भारत विज्ञान मंच’ (एसआईएफ) यांच्यावतीने आयोजित भारत विज्ञान महोत्सव 2007-2008 दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी भारताचे राजदूत अनिल वाधवा यांनी मेनका गांधी यांना हा पुरस्कार प्रदान केला.
ऐकोणिसाव्या शतकात ओमानमध्ये पीक व पशु यांच्या संवर्धनासाठी उल्लेखणीय कामगिरी करणा-या भारतीय व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.
भारतीय अंतरिक्ष शोध संस्थेचे (इसरो) अध्यक्ष जी. माधवन नायर यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणा-या मेनका गांधी दूस-या भारतीय व्यक्ती आहेत.