पुणे - देशात सध्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे लोकांचा ओढा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे या उद्योगाचा वार्षिक 15 टक्के दराने विकास होत असून हा विकास अधिका वेगाने व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून पुण्यात आयुर्वेदिक केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रासाठी 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सरकारी आणि खाजगी क्षेत्राच्या सहकार्यातून उभारल्या जाणा-या या प्रकल्पात औषधी प्रयोगशाळा उभारली जाणार तेथे या औषधांचा दर्जा उच्च कोटीचा ठेवण्याबरोबरच कच्च्या मालावर प्रक्रीया व पॅकींग व लेबलिंगची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
केंद्राने यासाठी महाराष्ट्र व केरळ या दोन राज्यांची निवड केली आहे. ही दोन्ही राज्ये पारंपरिक औषधींच्या वापरात अग्रेसर असून त्याला आता जागतिक स्तरावरुनही मान्यता मिळत आहे. या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुनील बेलगमवार यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पाचा 60 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. या प्रकल्पासाठी भारती किसान मंचाचे सहकार्य लाभणार आहे.