रायपूर - माओवाद्यांशी लढाण्याकरिता पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व माओवाद्यांच्या हल्ल्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आज छत्तीसगढ राज्याला भेट दिली. माओवादी हल्ल्याचे केंद्र असलेल्या दान्तेवाडा व बिजापूर जिल्हयांना त्यांनी भेट दिली.
राज्यपाल ई.एस.लक्ष्मन, मुख्यमंत्री रमन सिंग व राज्याचे गृहमंत्री रामविचार नेतम यावेळी त्यांच्या बरोबर होते. या भेटीदरम्यान ते आदिवासींशी चर्चा करणार आहेत. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दल व राज्या पोलिस विभागाला ही भेट देणार आहेत.
छत्तीसगढमध्ये 2007 सालात माओवादी हल्ल्यात 435 जणांचा बळी गेला असून यात 200 पोलिसांचा समावेश आहे.