मुंबई - देवाशिवाय कोणालाही घाबरत नसल्याचे सांगून दलिप सिंग राणा ऊर्फ खली याने 'गणपती बाप्पा मोरया' ची घोषणा दिली.
'द ग्रेट खली लाईव्ह इन मुंबई' या एका खेळ वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शोदरम्यान तो बोलत होता. डब्ल्यू.डब्ल्यू.ई सामन्यातील पहिला जगत्ज्येता म्हणून ख्याती पावलेला सात फूट दोन इंच व 190 किलो वजन असलेला अवाढव्य खली सांगत होता की, तो स्वतःसाठी नाही तर देशासाठी खेळतो. सर्व देशवासियांनी या कामी त्याच्या बराबर यावे व देशाला जास्तीत जास्त विजय मिळवून द्यावा.
भारतीय असल्याचा अभिमान असल्याचे सांगून तो म्हणाला, मी गो-यांची जोरदार धुलाई करतो या कामत जर माझ्याबरोबर आणखी भारतीय तरूण येऊन मिळाले तर मज्जा येईल.
खलीची बायको हरविंदर कौर यावेळी उपस्थित होते. या खेळात यायचे असेल तर मेहनत करा व ड्रगच्या नशेपासून दूर रहा, असा सल्ला त्याने युवकांना दिला.