जम्मू सांभा - दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या तीघांनी आज त्यांची सूटका करून घेतली. यात एक स्त्री व दोन मुलांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या एका स्त्रीची हत्या करून तिचा मृतदेह बाहेर फेकला.
या घटनेनंतर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. या दरम्यान दहशतवाद्यांशी लढण्यात पोलिस व्यस्त असताना या तिघांना सावधपणे त्यांची सूचका करून घेतली. जम्मूमध्ये 2002 सालानंतर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला होता.
काली मंडी भागात राहणा-या होशियार सिंग या गावक-याच्या घरात दहशतवाद्यांनी घुसून गोळीबार केला. या गोळीबारात होशियार सिंग व त्याची बायको
ठार झाली. तसेच त्याची मुलगी व आई या हल्ल्यात जखमी झाले. गावक-यांनी पोलिसांना या घटनेची बातमी दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झालेल्या चकमकीत एका सैनिकासहित एक छायापत्रकाराचा देखील मृत्यु झाला.