गुवाहाटी - आसामच्या उत्त-पूर्वेकडील भागात अलिप्तवादी गटाने दहा रेल्वेमजूरांना गोळया घालून ठार केले, अशी माहिती येथील पोलिस अधिका-यांना रविवारी दिली.
'ब्लॅक विडो' नावाने प्रसिध्द असलेल्या दिमा हालम दाओगा या प्रतिबंधित गटाच्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला असल्याची माहीती पोलिसांनी दिली. हे अतिरेकी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते, स्वयंचलित बंदूकांनी त्यांनी हा गोळी केला असल्याचे सांगण्यातक ाले.
काही दिवस आधी पोलिस चकमकीत झालेल्या त्यांच्या बारा साथीदारांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा गोळीबार केला असल्याचे या गटाने सांगितले. परंतू पोलिसांनी या वृत्तास दुजोरा दिला नाही.
दिमसा आदिवासी जमातीसाठी स्वतंत्र राज्य मिळावे, अशी ब्लॅक विडो गटाची मागणी आहे.