जयपूर - इंडियन प्रिमिअर लीगच्या येथे सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने राजस्थान रॉयल्स विरूध्द सात गडी बाद गमावत 156 धावा काढल्या.
फरवेझ मुशरर्फ (39), गौतम गंभीर (31) हे डेअरडेव्हिल्स संघातील सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघात दिमित्री मास्करेनस (2-29), शोन वॅटसन (2-21) व सिध्दार्थ त्रिवेदी (2-28) यांनी सर्वाधिक बळी घेतले.