मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चनवर तोफ डागली आहे. देशभरातील जनतेमुळे अमिताभ यांना सुपरस्टारचा सन्मान मिळाला असताना त्यांना मात्र त्यांच्या जन्मभूमीविषयीच आस्था आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला आहे
राज ठाकरेचे नावही मी ऐकले नाही, या जया बच्चनच्या विधानाला प्रतिउत्तर देताना ठाकरे म्हणाले की, बरं झालं त्या मला ओळखत नाही, नाहीतर त्यांनी सुध्दा मला माझ्या विधानांचे स्पष्टीकरण देण्याताठी बोलावले असते.
अमिताभचा अभिनय मला सुध्दा आवडतो, मात्र जर एका अभिनेत्याला त्याची जन्मभूमी इतकी प्रिय असेल तर महाराष्ट्रीयन लोकांना असू शकत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.