मुंबई- आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अद्याप एकही सामना न खेळू शकलेला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरुद्धच्या निर्णायक सामन्यात खेळण्याची शक्यता आहे, असे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी सांगितले. सचिन गेले दोन दिवस फलंदाजीचा सराव करत असल्याचे ते म्हणाले.
मांडीच्या दुखापतीने त्रस्त असलेला सचिन अद्याप स्पर्धेतील एकही सामना खेळू शकलेला नाही पण गेले दोन दिवस तो संघासोबत सराव सत्रामध्ये सहभागी होत आहे.
सचिनच्या नुसत्या उपस्थितीनेच संघाचे मनोधौर्य उंचावेल, असे राजपूत यांनी नमूद केले. येत्या 14 तारखेला महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई संघाविरुद्ध खेळण्यास सचिन तंदुरुस्त असला तर तो कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळेल. सध्या कर्णधारपदाची जबाबदारी शॉन पोलॉक सांभाळत आहे. पोलॉकची कामगिरी उत्तम आहे. मात्र सचिन आल्यानंतर सर्व काही त्याच्याभोवती फुरू लागेल, असेही राजपूत म्हणाले.
श्रीलंकेचा तडाखेबंद फलंदाज सनथ जयसूर्यासोबत सचिन सलामीला खेळण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स संघाने सातापैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या मिळालेल्या सहा दिवसांच्या विश्रांतीमुळे खेलाडून पुन्हा ताजेतवाने होऊन चेन्नईविरुद्धच्या सामन्यात उतरतील, असा विश्वास राजपूत यांनी व्यक्त केला.
Source :
PTI