मुखर्जी युएइच्या दौ-यावर
Monday, May 12, 2008 09:07 [IST]

दुबई- भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांचे आज येथे आगमन झाले. मुखर्जी तीन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरात दौ-यावर आहेत. भारत आणि युएइमध्ये चाललेल्या उच्चस्तरीय चर्चेचा भाग म्हणून ते या दौ-यावर आले आहेत.

मुखर्जी दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावरून थेट येथे आले. विमानतळावर त्यांच्या स्वागताला भारताचे युएइमधील राजदूत तालमिझ अहमद, दुबईतील वकिलातीचे प्रमुख वेणू राजमणी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

परराष्ट्र मंत्री या दौ-यादरम्यान युएइचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. ते युएइचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्लाह बिन झायेद आणि अबु धाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनाही आज भेटणार आहेत.

भारत व युएइ परस्पर व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करत असून आर्थिक संबंध दृढ करण्याच्या उद्देशानेच मुखर्जी या दौ-यावर आले आहेत, असे भारताचे युएइमधील राजदूत अहमद यांनी सांगितले. या दौ-यामध्ये कोणत्याही करारावर स्वाक्ष-या होणे अपेक्षित नसले तरी दोन्ही देशांमधील आर्थिक व राजकीय संबंधांवर चर्चा होणार आहे, असे ते म्हणाले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम