नवी दिल्ली- येत्या तीन-चार महिन्यांत चलनफुगवट्याचा दर सहा टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशी ग्वाही पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सी रंगराजन यांनी आज दिली.
येत्या तीन-चार महिन्यात चलनफुगवटा सहा टक्क्यांपर्यंत उतरेल आणि त्यानंतर पाऊस चांगला झाल्यास तो पाच-साडेपाच टक्क्यांपर्यंत खाली येईल, असे रंगराजन यांनी बातमीदारांना सांगितले.
जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांचा परिणाम स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावर झाला आहे. मात्र त्यामुळे विकासाची प्रक्रिया दिशाहीन वगैरे होणार नाही, असे रंगराजन यांनी स्पष्ट केले.