बंगळूर- कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या दुस-या टप्प्यासाठीच्या प्रचारात आज कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी भाग घेणार आहेत. उत्तर कन्नडा जिल्ह्यातील कुमटा येथे तसेच उडपी जिल्ह्यातील कुंडापुर येथे राहुल गांधी यांची प्रचार भाषणे होणार आहेत.
कर्नाटकातील तरुण मतदारांना कॉंग्रेसकडे वळविण्यासाठी राहुल गांधी प्रचार मैदानात उतरल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या प्रचारसभांबाबत कर्नाटक कॉग्रेसमधील युवा नेते विशेष उत्साही आहेत. राहुल गांधी चिकमंगळूर व देवनगिरी जिल्ह्यांमध्येही प्रचारसभांना उद्देशून भाषणे करणार आहेत.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीही उद्या कर्नाटकात प्रचारासाठी येणार आहेत. कोप्पाळ आणि मंगळूर जिल्ह्यातील प्रचारसभांना उद्देशून त्या भाषणे करतील असे अपेक्षित आहे.