दुबई - सतत बदलत्या मित्रांमुळे चर्चेत असलेल्या दीपिका पदुकोनने आता मात्र काही काळ का होईना एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला असून आपला सध्याचा मित्र अभिनेता रणबीर कपूरसोबत कोणत्याही प्रकारचे मतभेद झालेले नसून आमचे संबंध आजही उत्तम आहेत, असे स्पष्ट केले आहे.
होय मला बॉयफ्रेंड आहे, आणि आम्ही आनंदी आहोत, अशा शब्दांत तिने दुबई इथे बातमीदारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. माझ्या आणि रणबीरच्या संबंधात सध्या कटुता निर्माण झाल्याच्या बातम्या पसरल्या आहेत, मात्र त्या निव्वळ अफवा आहेत, असेही ती म्हणाली. एका रिअल इस्टेट कंपनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून ती आली असताना बोलत होती.
आपण आता सार्वजनिक जीवनात वावरत असून अशा प्रकारच्या अफवांना तोंड देता यायला हवे, असेही तिने तिच्या खाजगी जीवनाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर सांगितले.
रणबीर आणि माझ्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र आम्ही एकत्रच आहोत, आणि तो माझा प्रियकर आहे, असेही ती म्हणाली. याआधी दीपिकाचे नाव भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणी व त्यानंतर युवराज सिंगसोबत जोडले गेले होते.
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणातच ओम शांती ओम सारख्या यशस्वी चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली दीपिका आता निखिल अडवाणीच्या चांदणी चौक टू चायना या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
Source :
PTI